ग्रामपंचायत खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर ची यशोगाथा
- DIGITAL FLY
- Apr 14
- 1 min read

ग्रामपंचायत खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर ची यशोगाथा
खर्डा हे गाव कर्जत - जामखेड मतदार संघात असून , या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे . येथे निजाम व मराठा यांच्यात शेवटची लढाई होऊन या लढाईमध्ये मराठ्यांना विजय प्राप्त झालेला होता. त्या काळी शिवपट्टण नगरपरिषद म्हणून खर्डा गावची ओळख होती .
खर्डा गावामध्ये आजही १२ ऐतिहासिक वेस , १२ ज्योतिर्लिंग मंदिरे , शिवपट्टण किल्ला व निंबाळकर गढी या ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत...
ग्रामपंचायतीचे नाव - खर्डा ता.जामखेड जि. अअहिल्यानगर
लोकसंख्या - ११८७०
सदस्य संख्या - १७
सरपंचाचे नाव - सौ संजीवनी वैजिनाथ पाटील
उपसरपंच नाव -सौ शितल सुग्रीव भोसले
ग्रामपंचायत अधिकारी नाव - श्री बबन दामोदर बहिर
जिल्हा परिषद शाळा – १४
अंगणवाडी संख्या - २२
गावामध्ये केलेले उल्लेखनीय कामकाज..
१) गावास दररोज नियमितपणे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो..
२) गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटारी द्वारे केले जाते .
३) गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता कॉंक्रिटीकरण व पेवर ब्लॉक ची कामे केलेली आहेत..
४) गावांमध्ये सुसज्ज व भव्य अशी ग्रामसचिवालयाची इमारत आहे .
५) सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आहेत .
६) गावांमध्ये ८६ बचत गट आहेत , ग्रामपंचायतीच्या प्रेरणेमुळे बचत गटास राज्य स्तरीय
उद्योजकता पुरस्कार प्राप्त झालेला आहे ..
७) गावामध्ये लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झालेली आहेत . सदर
कामामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे..
८) गाव हागणदारीमुक्त असून , गावास ODF प्रमाणपत्र प्राप्त आहे..






Comments